- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणूचा विविध क्षेत्राला फटका बसला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. जिल्ह्यात दिवसाला ११७ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाकाठी ३ लाख ३६ हजार रुपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडवत आहे.कारोना विषाणूची धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे विविध क्षेत्रातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आयात-निर्यात बंद झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. पर्यटन, खासगी, मनोरंजन, मॉल्स-रेस्टॉरंट आदी सर्वच क्षेत्रांपाठोपाठ एसटी महामंडळालाही कोरानाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागीय कार्यालयाकडून ग्रामीण भाग व लांब पल्ल्याचे असे एकूण ४४० शेड्यूल धावतात. परंतू कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी लागल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक बंद झाली आहे. बाहेर गावी प्रवास करणारे नागरिकांनीही आता बसस्थानाकवर येणे, एसटी बसने प्रवास करणे कमी केले आहे. कोरोनाच्या भीतीने गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे प्रवाशी टाळत आहेत. त्याचा मोठा फटका हा एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागीय कार्यालयाकडून दिवसाला ११७ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाकाठी ३ लाख ३६ हजार रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाचे होत आहे. मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात प्रवाशांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.
आठवड्याला २३.५२ लाख रुपयांचे नुकसानशाळा, महाविद्यालय बंद असल्याने काही बसफेºया बंद करण्यात आल्या आहेत. मानव विकासच्या सर्वच बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवसाकाळी ३ लाख ३७ हजार याप्रमणे एका आठवड्याचे २३ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाचे होत आहे.
दिवसाचे १२ हजार कि़मी. अंतर रद्दग्रामीण भागासोबतच लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांचे नियोजनही कोलमडले आहे. एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागीय कार्यालयांतर्गत बसफेºयांचे ११ हजार ९९८ कि़मी. अंतर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आठवड्याचे ८३ हजार ९८६ कि़मी. अंतर रद्द झाले आहे.