लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यासोबतच त्याचे अहवाल त्वरित प्राप्त व्हावे, यासाठी वर्धा येथील खासगी प्रयोग शाळेत बुलडाणा जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.यासंदर्भात विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी २१ आॅगस्ट रोजी बुलडाणा येथे अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत अनुषंगीक निर्देश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोवीड स्थिती, गणेशोत्सवासंदर्भात आढावा घेतला. त्यावेळी हे निर्देश दिले.सोबतच बुलडाण्यातील कोरोना तपासणी प्रयोगशाळा ही त्वरित सुरू करण्याच्या दृ्ष्टीने प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. प्रसंगी येत्या दहा दिवसात ती सुरू होऊ शकते असे आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. गणेशोत्सवाच्या संदर्भानेही विबागीय आयुक्तांनी सविस्तर आढावा बैठकीत घेतला.
CoronaVirus : संदिग्धांचे स्वॅब आता वर्ध्याला पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 11:02 AM