लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट म्हणून समोर आलेल्या मलकापूर शहरात सलग तीन दिवस कडकडीत संचारबंदी किंवा लॉकडाऊन करण्याच्या मानसिकतेत जिल्हा प्रशासन आले आहे.यासंदर्भात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. राजेश एकडे आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये जवळपास १५ मिनीट चर्चा झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर तयारी व नियोजनाचा आढावा घेवून रविवार पासून किंवा रविवारनंतर सलग तीन दिवस मलकापूर शहरात संचारबंदी किंवा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याची केवळ आता औपचारिक घोषणा होणेच बाकी आहे. शहरात वार्डनिहाय समित्या गठीत करण्यात आल्या असून व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांनीही निर्णया सकारात्मक प्रतिसाद जिल्हा आहे.दुसरीकडे पालमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मध्यंतरी झालेल्या चर्चेनंतर जिल्हास्तरावर योग्य वाटेल तो निर्णय घेण्याची मुभा मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना दिली आहे. त्यानुषंगाने डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मलकापूरमधील कोरोनाचा संसर्क नियंत्रीत करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचे संकेत यंत्रणेला दिले आहेत. आ. राजेश एकडे यांचीही यात महत्त्वाची भूमिका असून जिल्हाधिकारी कार्यालयात १८ जून रोजी यावर चर्चा झाली.
मलकापूरमधील सात जण झाले कोरोना मुक्तगुरूवारी मलकापूर येथील सात व शेगाव येथील एक असे आठ जण कोरोना मुक्त झाले. मलकापूर येथील पाच महिला, दोन पुरुषांचा यात समावेश असून शेगाव येथील ३० वर्षीय व्यक्तीनेही कोरोनावर मात केली आहे. मलकापूरमधील भीमनगर, हनुमान चौक परिसरातील व्यक्तींचा यात समोश आहे. मलकापूर त्यामुळे मलकापूर शहराला एक दिसाला मिळाला आहे. सध्या मलकापूर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहे. मात्र गेल्या काही दिवासापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.