लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शहरातील इदगाह परिसरातील एकूण तिन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी एक पॉझिटिव्ह रूग्ण असतांना काल रात्री उशिरा आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. ही वार्ता शहरात पसरात सकाळ पासूनच सगळीकडे शुकशुकाट होता. तर जिल्हा पोलीस दल व स्थानिक पोलीसांचा स्टे च्या वतीने शहरातील प्रमुख मागार्ने ध्वज संचलन काढण्यात आले. ध्वज संचलनाचे माध्यमातून जि. पो.अधिक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी नागरिकांना स्वयंशिस्तीचा संदेश दिला. गर्दी टाळण्यासाठी शहरातील सार्वजनिक स्थळी भाजीपाला विक्रीला पुर्णपणे बंदी घालण्यात आली. सोशल डिस्टसिंग पाळण्यात नागरिकांनी प्राधान्यक्रम देण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. न प मुख्याधिकारी डॉ प्रशांत शेळके यांनी भाजीपाला व किराणा सामान शहरवासियांना घरपोच मिळण्यासाठी विक्रेत्याचे मोबाईल नंबर सह नावाचे यादीचा आदेश काढला आहे. शहरातील विविध परिसरासह शेगावच्या सिमा सिल करण्यात आल्या आहेत. इदगाह परिसरासह १०० मिटरचा परिसर हायरिस्क झोन म्हणून घोषित केला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण घोंगटे यांच्यासह आरोग्य कर्मचारी या परिसरातील नागरिकांची तपासणी करीत आहेत. सोबत ठाणेदार संतोष ताले व पोलीस शहरात बंदोबस्त देत सुध्दा संचारबंदीदरम्यान नियम न पाळणार्याविरूध्द कडक कारवाई करीत आहेत.
पाच वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह
पाच वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तो परीसरात आजुबाजुला कोण कोणत्या मुला सोबत खेळत होता याची माहीती वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे पथक विविध परिसरात घरोघरी जावून घेत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांची भेट!
जिल्हाधिकारी डॉ सुमन चंद्रा यांनी शेगावला भेट देवून शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला, श्री गजानन महाराज संस्थान चे कम्युनिटी किचन,शहरातील हायरिस्क झोन परिसर व सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वार्ड ला भेट स्थिती जाणून घेतली. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार शिल्पा बोबडे यांनी आढावा दिला.
शहरात तिन पॉझिटिव्ह रूग्ण असल्याचे स्पष्ट झाल्याने शहरातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, बॅकासमोर गर्दी करू नये ,सोशल डिस्टंसिंग पाळणे महत्वाचे आहे. शक्यतोवर घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे.
- शिल्पा बोबडे तहसीलदार शेगाव.