लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा १९ जुलै रोजी मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात ३९ जणांचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. त्यामुळे, जिल्ह्यात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रुग्णसंख्या ७४२ वर पोहचली असून ३६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३५३ जणांनी कोरानावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २०० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी १६१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३९ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३४ व रॅपिड टेस्टमधील ५ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १३२ तर रॅपिड टेस्टमधील २९ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये मलकापूर येथील ३६ महिला व २८ वर्षीय पुरूष, नांदुरा येथील पोलीस क्वार्टरमागे ४२ वर्षीय पुरूष, नांदुरा खुर्द १७ वर्षीय पुरूष व २० वर्षीय महिला, खालखेड ता. नांदुरा ५६ वर्षीय महिला, चांदुर बिस्वा ता. नांदुरा ८० वर्षीय पुरूष, दे. राजा : ८० वर्षीय महिला, अहिंसा मार्ग ७ वर्षीय मुलगी, १ वर्षीय मुलगा, ३० वर्षीय महिला, सिव्हील कॉलनी २१ पुरूष, दुगार्पूरा ४० वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय महिला, शेगांव: दसरा नगर १० वर्षीय मुलगा, ६१ वर्षीय पुरूष, देशमुखपूरा ३० वर्षीय पुरूष, खामगांव : ३८ वर्षीय पुरूष, ५७ वर्षीय पुरूष, वाडी ४८ वर्षीय पुरूष, बालाजी फैल २७, ५८, ४७ व ५२ वर्षीय पुरूष, ४४ व ५१ वर्षीय महिला, फरशी रोड 45 वर्षीय महिला, रायगड कॉलनी २८ वर्षीय पुरूष, राठी प्लॉट २९ वर्षीय पुरूष, सिव्हील लाईन १० वर्षीय मुलगा, २६ वर्षीय पुरूष, यशोदरा नगर ४५ वर्षीय महिला, जळका भडंग ता. खामगांव : ६५ वर्षीय पुरूष,सुटाळा खुर्द ७४ वर्षीय महिला, भालेगांव ता. खामगांव 66 वर्षीय महिला, बुलडाणा : नक्षत्र अपार्टमेंट 54 व 76 वर्षीय महिला व 58 वर्षीय पुरूष, कोथळी ता. मोताळा : 82 वर्षीय पुरूष, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 39 रूग्ण आढळले आहे.त्याचप्रमाणे आज उपचारादरम्यान बुलडाणा येथे गुळभेली ता. मोताळा येथील 47 वषीय पुरूष आणि जळका भडंग ता. खामगांव येथील 56 वर्षीय पुरूष रूग्णाचा खामगाव येथे मृत्यू झाला आहे.तसेच आज 27 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत एका दिवसात सर्वात जास्त रूग्णांना सुट्टी आज देण्यात आली आहे.
एकाच दिवशी २७ जणांची कोरोनावर मातजिल्ह्यात आज २७ जणांनी कोरानावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी 237 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ६०३३ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ७४२ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 3५३ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ३६७ कोरोना बाधीतांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.