लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : पालिकेतील अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांनी शुक्रवारी संबधित अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर वेळेचे फलक लावत गांधीगिरी केली. या आंदोलनाची पालिकेत चांगली चर्चा सुरु होती. खामगाव नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. यामुळे कामकाजात खोळंबा निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांनी अनेकदा तोंडी कळवले होते. तरी त्यात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे २५ जूनरोजी नगराध्यक्षांना याबाबत पत्र देवून लेखी अवगत केले होते. हे प्रकरण मुख्याधिकारी पर्यंत पोहचून त्यांनी विभागप्रमुखांना नोटीसेस बजावल्या होत्या. परंतू त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वागणूकीत काहीच फरक पडला नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेत जावून विविध विभागाच्या प्रवेशद्वारावर कार्यालयीन वेळेचे फलक लावले. त्या फलकावर कर्मचारी उपस्थित नसल्यास नागरिकांनी सहाय्यक कार्यालयीन अधिक्षक एल.जी.राठोड यांच्याकडे कळवावे असे आवाहन केले.
नगरसेवकाची खामगाव नगरपालिकेत गांधिगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 2:42 PM
खामगाव : पालिकेतील अधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांनी शुक्रवारी संबधित अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर वेळेचे फलक लावत गांधीगिरी केली.
ठळक मुद्देखामगाव नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत गैरहजर राहत आहेत. याबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांनी अनेकदा तोंडी कळवले होते.अखेर त्यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेत जावून विविध विभागाच्या प्रवेशद्वारावर कार्यालयीन वेळेचे फलक लावले.