गावातील प्रभावती मारोती नागरे व विठ्ठल विश्वनाथ जायभाये यांच्या घरासोमरचे सिमेंट रोड केल्याचे बोगस काम दाखवून सीसीएमबी करून ५० हजाराचे बिल काढले आहे. प्रत्यक्षात मात्र, कोणतेच काम केलेले नाही. पहिल्याच झालेल्या रस्त्यात गावातील काही प्रतिष्ठित मंडळींनी २० ते २५ सिमेंट बॅग टाकून रस्ता बरोबर करून घेतला होता. लोकांनी केलेल्या रस्त्याचेच अभियंता, सचिव, सरपंच यांनी खोटेनाटे बिल बनवून ५० हजार काढले, तसेच गावात वस्तीत पाच लाख रुपयाची कामेसुद्धा बोगस झालेली आहे. ती ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी केलेली नाही तसेच ती सुद्धा बोगसच झालेली आहे.
अभियंता कधीच कामावर जात नाहीत
लोणार पंचायत समितीचे अभियंता हे कधीच कामावर जाऊन काम बघत नाहीत. ते टक्केवारी घेऊन कार्यालयातूनच सीसीएमबी करतात तरी सचिव व अभियंता यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खातेनिहाय चौकशी करून दोषी सरपंच, सचिव, अभियंता यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सदाशिव जायभाये यांनी निवेदनातून केलेली आहे.
लोणार पंचायत समिती बनला टक्केवारीचा अड्डा
कमिशन शिवाय कोणतेच काम होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. परंतु त्यांना नेहमी केराची टोपली दाखवली जाते. यापूर्वी ही ५ टक्के कमिशन घेतल्याशिवाय सीसीएमबी होत नाही असे प्रकार घडलेले आहेत.
सदाशिव जायभाये, निवेदनकर्ते.
या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून व तपासणी करूनच बिले काढण्यात आली आहेत.
-.... शिंदे, शाखा अभियंता पंचायत समिती, लोणार.