खामगाव : येथील एमआयडीसीतील एका कापूस गोदामाला सायंकाळी ४.४५ वजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत गोदामातील कापसाच्या गठाणी जळुन खाक झाल्या. यासंदर्भात नुकसानाची माहिती मिळू शकली नाही. खामगाव येथील एमआयडीसीतील राष्ट्रीय महामार्गावर अकोला येथील वसंत गोयंका यांच्या मालकीचे कापूस प्रक्रिया उद्योग आहे. दरम्यान दुपारी याठिकाणच्या गोदामाला अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोदामातील कापसाच्या गठाणी जळुन खाक झाल्या. यावेळी पालिकेचे चार अग्णीशमन बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. घटनेचा पंचनामा करण्यासाठी शिवाजी नगर पोलिस घटनास्थळी दाखल असून ते उपस्थितांचे बयाण नोंदवित आहेत. यासंदर्भात गोयंका कापूस प्रक्रिया उद्योगाचे संचालक वसंत गोयंका यांच्याशी संपर्क केला असता, आपण सध्या अकोला येथून खामगाव येथे निघालो आहोत नुकसाना संदर्भात निश्चित माहिती आताच सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
खामगाव येथील एमआयडीसीत कापसाच्या गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 5:47 PM
खामगाव : येथील एमआयडीसीतील एका कापूस गोदामाला सायंकाळी ४.४५ वजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावर अकोला येथील वसंत गोयंका यांच्या मालकीचे कापूस प्रक्रिया उद्योग आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने गोदामातील कापसाच्या गठाणी जळुन खाक झाल्या. यावेळी पालिकेचे चार अग्णीशमन बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले होते.