लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून तयार झालेल्या परिस्थितीत बेघर, विस्थापीत, स्थलांतरीत मजूर आणि कामगार यांना धीर देण्यासाठी मानसिक आणि भावनिक समुपदेशन देण्यासाठी खामगावातील ‘तरुणाई’नं पुढाकार घेतला आहे. कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने गत २२ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. या काळात आपल्या गावी परतणारे मजूर आणि बेघरांना खामगाव येथील वसतीगृहात क्वारंटाईन करण्यात आले आहे. गत १५ दिवसांपासून क्वारंटाईन असलेल्या बेघर, मजूर आणि कामगारांना महसूल प्रशासन आणि सेवाभावी संस्थांकडून जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी तरूणाई फांउडेशनचे संस्थापक मनजीतसिंह शीख यांच्या नेतृत्वात तरुणाईच्या सदस्यांनी विस्थापितांचे समुदेशन केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
समुपदेशनासोबत योगाचे धडे!एखाद्या परिस्थितीत कोणाला एकटे रहावे लागले ही स्थिती अंत्यत गंभीर असते. अशा परिस्थितीत त्याची मानसिक बाजू सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे, असे केले नाही तर त्या व्यक्तीवर भविष्यात मोठा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे रविवारी सकाळी तरुणाई फांउडेशनच्यावतीने घाटपुरी रोडवरील विस्थापितांना योगाचे धडे देण्यात आले. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात आले.