लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव राजा : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिंपळगाव राजा - घाटपुरी रस्त्यावरील पाणी जलशुद्धीकरण केंद्राजवळ रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मालवाहू वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जगदीश महादेव मुंडे (वय ३०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी लक्ष्मी (वय २५) यांचा खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात त्यांची २ वर्षाची मुलगी श्रेया हिला कुठलीही दुखापत झालेली नाही. ढोरपगाव येथील मुंडे दाम्पत्य मुलगी श्रेयासह दुचाकीने खामगावकडे जात होते. घाटपुरीनजीक असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ भरधाव मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत जगदीश यांचा जागीच मृत्यू झाला तर लक्ष्मी मुंडे या गंभीर जखमी झाल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असतानाच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्यांची दोन वर्षीय मुलगी श्रेया बालंबाल बचावली. या अपघाताची माहिती नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांना दिली; मात्र तोपर्यंत मालवाहू वाहनाचा चालक मुसताक खान करजत खान (रा. मोताळा) हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पिंपळगाव राजा येथील गणेश सातव यांनी या वाहनचालकाला वाहन क्रमांक (एमएच २८, एबी ३९६४)सह ताब्यात घेऊन पिंपळगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी आरोपीला शिक्षा न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा निषेध नोंदवला जाणार आहे. या घटनेचा तपास शिवाजीनगरचे ठाणेदार सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मालवाहुची दुचाकीला धडक; दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 1:01 PM
या अपघातात दुचाकीस्वार जगदीश महादेव मुंडे (वय ३०) व त्यांची पत्नी लक्ष्मी (वय २५) यांचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देत्यांची दोन वर्षीय मुलगी श्रेया बालंबाल बचावली.मालवाहू वाहनाचा चालक घटनास्थळावरून पळून गेला होता.