शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
5
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
6
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
7
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
8
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
9
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
10
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
11
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
12
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
13
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
14
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
15
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
16
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
17
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
18
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
19
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
20
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला न्यायालयाची स्थगिती

By admin | Published: July 11, 2017 12:01 AM

चिखली येथे तांदळाचा ट्रक पकडण्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शेलुद येथे पकडलेल्या तांदळाच्या ट्रकप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला जबाबदार धरुन सुरु केलेल्या कारवाईला नागपूर उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे.भारतीय खाद्य निगमच्या खामगाव गोदामातून अमडापूर गोदामासाठी निघालेला ट्रक क्रमांक एम.एच.१९ झेड २०९७ मध्ये ३५० कट्टे तांदूळ होता. अमडापूर येथील गोदामात साठा करण्यासाठी जागा नसल्याने हा ट्रक चिखली गोदामात वळता करण्यात आला. अमडापूर- चिखली दरम्यान गोदामात पोचण्यापूर्वीच हा ट्रक शेलुद ग्रामस्थांनी संशयावरून अडवला. यावेळी मारहाणीच्या धाकाने क्लिनर पळून गेला. त्याचवेळी चिखली पोलिसांनी ट्रकमालकावर गुन्हे दाखल करुन अटक केली. याप्रकरणी तहसीलदार यांच्या तक्रारीवरून वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्टच्या मालकावर गुन्हे दाखल केले. याप्रकरणी धान्य अपहाराचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी पुलकुंडकर यांनी वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट यांना करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यासाठी २३ जून रोजी कारणे दाखवा नोटिस बजावली. दरम्यान, शासकीय दस्तवेजासह स्पष्टीकरण सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी विनंती श्रीनाथ ट्रान्सपोर्टच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण सादर करण्यास अल्प मुदत देत याप्रकरणी चौकशी करण्यासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांची समिती गठित केली. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी श्रीनाथ ट्रान्सपोर्टच्यावतीने नागपूर न्यायालयात कारणे दाखवा नोटिससह कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली. ती दाखल करून घेत न्यायालयाने ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या कारवाईला स्थगिती दिली. सोबतच ट्रकमालकाची जामिनावर मुक्तता केली.