शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

खामगावातील कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:42 AM

Covid Hospital in Khamgaon ५० बेडची क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयात आणखी दहा बेड वाढविण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खामगाव येथील ५० बेडची क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयात आणखी दहा बेड वाढविण्यात आले आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत येथील मनुष्यबळ कमी पडत असल्याने उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा कोविडचा भार वाढल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यानंतर कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट पाहावयास मिळाली. परिणामी जिल्ह्यातील जवळपास सर्वच कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नाहीत, अशा रुग्णांचा घरीच उपचार सुरू झाला. त्यानंतर मागील आठवडाभरात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने दिसू लागला. उपजिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ झाल्याने मागील पाच दिवसांतच रुग्णालय प्रशासनाने कोविड रुग्णालयात आणखी १० बेड वाढविण्यात आले आहेत.  सद्यस्थितीत रुग्णांची संख्या वाढत असूनही सुरक्षेबाबतची सतर्कता वाढलेली दिसत नाही. त्यामुळे परिस्थिती अशीच कायम राहिली तर मार्च महिन्यापर्यंत आणि मार्चनंतर रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोकाही नाकारता येत नाही. 

घाटाखालील सहा तालुक्यांतील रुग्णघाटाखालील सहा तालुक्यातील कोरोना रुग्ण खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये खामगाव, नांदुरा, मलकापूर, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा ताण वाढत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या