सुहास वाघमारे / नांदुरा (जि. बुलडाणा): खालावलेली भुजल पातळी व त्यामुळे पाण्यात वाढलेले क्षारांचे प्रमाण यामुळे अर्धा तालुका व नांदुरा शहर परिसरात मुत्रपिंड निकामी होणे, मुतखडा व मुत्रपिंडाचे आजार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार तालुक्यातील ३0 गावे व नांदुरा शहराला खारपाणपट्टयाचा शापाने ग्रासले आहे. खारपाणपट्टयातील गावे व शहरातील पाणी फिल्टर करून नागरिकांना देणे आता गरजेचे झाले आहे. नांदुरा तालुक्यातील पुर्णा परिसरातील गावे प्रामुख्याने खारपाणपट्टयात येतात. त्या गावांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने गोळा करून त्यांची तपासणी केली असता अर्धा तालुका व शहर खारपाणपट्टयाच्या गडद छायेत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील दहीवडी, खुमगाव, भुईशिंगा, नारखेड, बेलाड, येरळी, पातोंडा, पलसोडा, कोदरखेड, खरकुंडी, अलमपूर, निमगाव, इसबपुर, इसरखेड, हिंगणे गव्हाड, पिंप्री कोळी, जिगाव, खेळगाव, मामुलवाडी, मोमीनाबाद, सावरगाव नेहू, सावरगाव चाहू, टाकळी वतपाळ, धानोरा, वडनेर भोलजी, धानोरा, विटाळी खैरा, टाकरखेड, शेंबा बु. व फुली या सर्व गावांचा समावेश खारपाणपट्टयात करण्यात आला आहे. नांदुरा शहरातील पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने घेतले होते. त्यामुळे शहर हे खारपाणपट्यात मोडते.
३0 गावांना खारपाणपट्ट्याचा शाप
By admin | Published: January 23, 2016 2:07 AM