अमडापूर (जि. बुलडाणा), दि. २- चिखली तालुक्यातील दहीगाव येथे एकाच समाजातील दोन गटात हाणामारी होऊन काही लोक जखमी झाल्याची घटना १ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी अमडापूर पो.स्टे.ला सुरेखा लहाने या महिलेने तक्रार दिली, की १ एप्रिल रोजी रात्री आरोपी दिलीप दगडू लहाने, आकाश सुरेश लहाने, सुलोचना दिलीप लहाने, पार्वता सुरेश लहाने, सुरेश सुखलाल लहाने, गजानन दगडू लहाने सर्व रा. दहीगाव यांनी आमच्याविरुद्ध रिपोर्ट का दिला, असे म्हणून मला व पती, दीर, सासू यांना लाठय़ाकाठय़ांनी डोक्यावर, पाठीवर, हातावर, पायावर मारून जखमी केले. यावरून गुन्हा दाखल केला. तसेच सुरेश सुकलाल लहाने याने तक्रार दिली की, आरोपी किशोर लहाने, विनोद लहाने, मंदाबाई लहाने, राजाराम रूपचंद लहाने, रेखा विनोद लहाने यांनी मुलगा, पत्नी, आई यांना व मला डोक्यावर, पाठीवर, हातावर, पायावर, कानावर फावडे व फावड्याच्या दांड्याने मारून जखमी केले. यावरुन गुन्हा दाखल करून पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहे.
दहीगाव येथे क्षुल्लक कारणावरून हाणामारी
By admin | Published: April 03, 2017 3:19 AM