सप्टेंबर महिन्यात सुरुवातीपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने डेंग्यू, मलेरियासह व्हायरल फ्लू अशा अनेक साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी बालकांसाठी कक्ष निर्माण केलेले आहेतच; मात्र, तूर्तास कोरोना आटोक्यात असल्यामुळे ते कक्ष रिकामे आहेत. ती आस्थापना कार्यरत करणे शक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. दुसरीकडे खासगी रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या ओसंडून वाहत असल्यामुळे गोरगरिबांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणे सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. सोबतच या रुग्णालयातील कमाल रुग्णसंख्या पूर्ण झालेली असून, अतिरिक्त रुग्ण ठेवण्याकरिता जागा उपलब्ध नाही. तेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे लहान बालकांसाठी वेगळे कक्ष निर्माण करणे गरजेचे असल्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून पुरेसा औषधोपचारांचा साठा तथा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी मान्य केली आहे. यावेळी शहराध्यक्ष दत्ता काकस, तालुकाध्यक्ष सुनील तायडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
साथीचे आजार रोखण्यासाठी बालकांसाठी विशेष वॉर्ड तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:37 AM