केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात देशामध्ये मेगा टेक्स्टाइल पार्कची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने अशोक अग्रवाल यांनी वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यानुसार परिसरात शासनाने २००९ मध्ये चिखली औद्योगिक क्षेत्रातील ४० हेक्टर जमीन पार्कसाठी मंजूर केलेली आहे. टेक्स्टाइल व गारमेंट उद्योगाला अपेक्षित कुशल मनुष्यबळाची उपलब्धता येथे सहजतेने होऊ शकते. या उद्योगासाठी गरजेची असलेली टेक्स्टाइल अपडेशन स्कीम योजनेसाठी केंद्र सरकारने कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. बुलडाणा जिल्ह्याला कापूस उत्पादनाचा ६० वर्षांचा इतिहास आहे. जिल्ह्यातील कापूस विदेशात निर्यात होतो. समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई तसेच जालना, खामगाव रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे. या ठिकाणी मेगा टेक्स्टाइल पार्क झाल्यास मागासलेल्या जिल्ह्याला न्याय मिळेल. बेरोजगारांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. पर्यायाने रोजगार उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. त्यामुळे येथे टेक्स्टाइल पार्कची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी अशोक अग्रवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, माजी आमदार चैनसुख संचेती, आ. श्वेता महाले यांना देण्यात आले आहे.
चिखलीतील औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्स्टाइल पार्कची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:32 AM