शेगाव (जि. बुलडाणा): शेगाव ग्रामिण पो.स्टे.अंतर्गत येणार्या भोनगांव शिवारात सोमवारी पहाटे शेगाव येथील एका पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करणारे शेषराव शंकर काटकर (५७) यांचा मृतदेह आढळला. शेषराव काटकर हे भोनगांव येथील राहणारे असून ते शेगाव शहरातील एका पतसंस्थेत मागील काही वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास भोनगाव शिवारातील मालकीच्या शेतामधील निंबाच्या झाडाखाली प्रेत पडलेले आढळून आले. श्रीकृष्ण भारसाकळे यांनी ग्रामिण पो.स्टे.ला दिलेल्या फिर्यादीवरुन अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.
पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा आढळला मृतदेह!
By admin | Published: January 24, 2017 2:36 AM