खामगाव(जि. बुलडाणा), दि. ३१: तालुक्यातील पिंप्री गवळी येथील २५ वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरवाडीतील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लता गजानन निकम या विवाहितेने २९ ऑगस्टच्या रात्री पिंप्री गवळी ग्राम पंचायतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृतक विवाहि तेचा भाऊ संदीप अंकुश देशपांडे (वय २७) रा. मोहदुरा जि. भंडारा यांनी मंगळवारी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की गजानन निकम, कांताबाई निकम, शिवदास निकम, प्रमिला निकम व दुर्गादास निकम यांनी माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. संदीप देशपांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन निकमसह पाच जणांविरुद्ध कलम ४९८, ३0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: September 01, 2016 2:19 AM