खामगाव : भाजपशी जवळीक का साधत आहे, असे म्हणून राजेंद्र सानंदा यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शहरातील सत्येंद्रसिंह ठाकूर यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी राजेंद्र सानंदा व आणखी एक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील रहिवासी सत्येंद्रसिंह ठाकूर हे सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अनिकट रस्त्याने घराकडे जात असताना त्यांना राजेंद्र सानंदा व त्यांचेसोबत असलेल्या एकाने अडवून तू भाजपाशी जास्त जवळीक का साधतो, असे म्हणत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या आशयाच्या सत्येंद्रसिंह ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी राजेंद्र सानंदा व आणखी एक अशा दोघांविरुद्ध कलम ३४१, ३२३, ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र सानंदाविरुद्ध गुन्हा
By admin | Published: May 23, 2017 12:42 AM