लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शौचास गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी युवकाने गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यांतर्गत एका गावात घडली. याबाबत मुलीने पोलिसांत तक्रार दिली. गावातीलच २५ वर्षीय युवक तिचा पाठलाग करून माझ्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावत होता. दरम्यान, गुरुवारी मुलगी शौचास गेली असता त्याने गैरवर्तन केले. तसेच तिचे तोंड दाबून लग्न कर नाही तर बदनामी करून लग्न होऊ देणार नाही’, अशी धमकी दिली. मात्र मुलीची आई दिसताच त्याने पळ काढला. अशी तक्रार दिली आहे. पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग; युवकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:09 PM