लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कामठीमधून बुलडाणा जिल्ह्यात धार्मिक कार्यासाठी आलेल्या अल्पसंख्यांक समाजातील ११ जणांविरोधात त्यांचे जिल्ह्यातील अस्तित्व लपवून राहल्याप्रकरणी विविध कलमान्वेय बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघे २५ एप्रिल रोजी तपासणी केल्यानंतर कोरोना पॉझीटीव्ह आढळून आले होते. त्याची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायदा तथा भारतीय दंड संहतेच्या विविध कलमान्वये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसद्वारे बुलडाणा जिल्ह्यात शेगाव मार्गे दाखल झालेल्या या व्यक्ती प्रारंभी खामगाव येथे त्यानंतर चिखली येथे व नंतर २० मार्च पासून बुलडाणा येथील एका धार्मिक स्थली आश्रयास होत्या. मुळच्या नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील इस्माईल पुरा भागात त्या राहणाºया होत्या. धार्मिक कार्याकरीता त्या बुलडाणा जिल्ह्यात आल्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बुलडाण्यातील धार्मिक स्थळी चार, चार आणि तिघे असे मिळून त्या राहत होत्या. कोरोना संसर्गाच्या चाचणीबाबत त्यांना विचारणाही तहसिल कार्यालयाकडून करण्यात आली होती. तशा सुचन्ही त्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेला एक व्यक्ती पॉझीटीव्ह आढळून आला होता. त्यावेळी वेळोवेळी त्यांना चाचणी करण्याच्या सुचना दिल्या गेल्या होत्या. मात्र त्यांनी चाचणी केली नाही. गावी परत जाण्यासाठी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केला असता त्यांना त्यांची तपासणी केली असता त्यांच्यापैकी तिघे पॉझीटीव्ह आढळून आले होते.प्रकरणी वेळोवेळी सुचना देऊनही त्यांनी चाचणी न करता आपले अस्तित्व लपवून ठेवल्याप्रकरणी तथा तपासणीस सहकार्य न केल्याप्रकरणी या संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एसपी आॅफीस, एसडीपीओ,पोलिस ठाण्याशी संपर्कया ११ व्यक्तींपैकी काहींचा पोलिस अधीक्षक कार्यालय, एलसीबी कार्यालय, रिडरर्स, ब्रॅन्च एसडीपीओ कार्यालय आणि बुलडाणा शहर पोलिस ठाण्याशी संपर्क आला होता. त्यानुषंगाने आता पुढील खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
‘त्या’ ११ जणांपैकी एक जण पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्ज देण्यासाठी आला होता. त्यानुषंगाने नंतर पोलिस कर्मचारी प्रकरणाच्या चौकशी संदर्भाने गेले होते. संबंधितांची यादी बनवून ती आरोग्य विभागाच्या सुपूर्द केली आहे. मेडिकल प्रोटोकॉलनुसार पुढील कार्यवाही आरोग्य विभाग करेल.-डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा पोलिस अधीक्षक