बुलडाणा: जिल्ह्यातील एसटी बसगाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यात आता रस्त्यांची कामे सुरू असल्याने एसटीचे टायर पंक्चर होण्याचे संकट ओढावले असून प्रवाशांना रस्त्यावर अडकुन बसावे लागत आहे. दिवसाला प्रत्येक आगारामध्ये १० ते १५ बसेस पंक्चर काढण्यासाठी येत आहेत. सध्या सर्वत्र रस्त्यांची नुतनीकरण, रुंदीकरण यासाखे विविध कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते उखडलेले असून काही ठिकाणचे काम अर्धवट झालेली आहे. खराब रस्त्यांमुळे एसटी आधीच खिळखिळी झाली आहे. त्यात आता टायर पंक्चर होण्याचे प्रकार वाढलेले दिसून येत आहेत. अनेकवेळा टायर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. टायर व ट्यूबचा वेळेवर पुरवठा न झाल्यास जुन्याच टायरवर बस सोडल्या जाते. जिल्ह्यात सर्वत्रच अशी स्थिती आहे. बसेसना खराब टायर लावून बस मार्गस्थ केल्या जात असल्याने टायर वारंवार पंक्चर होण्याचा धोका वाढला आहे. बसचा टायर पंक्चर झाल्यास प्रवाशांचा रोष चालक व वाहकांवर येतो. बसेसना टायरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने जुनेच टायर वापरावे लागत आहेत. काही टायर तर पूर्ण गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे सध्याच्या उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच टायर पंक्चरचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे.
एशियाड बसेसचे टायरही जुनाटसाध्या बसेस पाठोपाठ एशियाड बसेसचेही टायर जुनाट बसविले जात असल्याने टायर पंक्चरचे प्रकार वाढत आहेत. मेहकर आगाराची ही बस मेहकर ते जळगाव जाणारी (क्र. एम-एच- के-आर- ५०७५) एशीयाड बस १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता चिखली येथे पंक्चर झाली. त्यामुळे समारे जाणाºया प्रवाशांना अनेक तास चिखली येथेच अडकुन बसावे लागले. या बसचे बसभाडे इतर बसपेक्षा जास्त असूनही प्रवाशांना जादा भाड्यावर साध्या बसमध्ये जावे लागले. असाच प्रकार वारंवार होत असल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत.