जऊळका येथील आश्रुबा बुधवत, रामकृष्ण बुधवत व प्रकाश बुधवत यांच्या शेतातील गहू, शाळू, हरबर पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाले आहे. जऊळका गावाला लागूनच वनिकरणाचा भाग आहे. या जंगलामध्ये रोही, हरीण, रानडुक्कर यासारखे अनेक वन्य प्राणी आहेत. या वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्य प्राणी पिकांवर ताव मारत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे काही शेतकरी रात्रीला जागर करत आहेत. ग्रामपंचायतने वनविभागाकडे वन परिसरात कुंपण करण्याची मागणी यापूर्वी केलेली आहे. परंतु त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा सर्वे करण्यात यावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आश्रुबा बुधवत, रामकृष्ण बुधवत व प्रकाश बुधवत यांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. परंतू एक आठवडा लोटला असताना अद्याप वन विभागातर्फे सर्वे करण्यात आला नाही.
पिकांचे नुकसान, सर्वेकडे दुुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:30 AM