शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

दीड लाखापैकी ४.५0 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 2:39 AM

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील सात हजार शेतक-यांनी उतरविला विमा.

बुलडाणा, दि. १८- जिल्ह्यात १ लाख ४५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. या पिकांना सुरक्षेचे कवच मिळावे म्हणून रब्बी हंगाम २0१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हय़ात राबविण्यात आली. १८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ३५७ हेक्टर रब्बी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात साडेसात हजार शेतकर्‍यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.जिल्ह्यात सप्टेंबर २0१६ पासून रब्बीची पेरणी करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर संभाव्य नैसर्गिक आपत्ती, कीड व अळींचा हल्ला, उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान आदी बाबींमध्ये रब्बी पिकांना सुरक्षा मिळावी, तसेच शेतकर्‍यांना त्याची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टिकोणातून जिल्ह्यात पीक विमा योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर घोषित करण्यात आली आहे;मात्र शेतकर्‍यांकडून योजनेस अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे १0 जानेवारी २0१७ पर्यंत पुन्हा योजनेला मुदतवाढ देण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून १८ जानेवारी रोजी प्राप्त अहवालानुसार, पीक विमा योजनेत सहभाग नोंदवित जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ७ हजार ५४२ शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत ७ लाख ७२ हजार ३३८ रुपयांचा हप्ता भरला आहे. यातून ४ हजार ३५७ हेक्टर रब्बी क्षेत्र सुरक्षित झाले आहे. शेतकर्‍यांनी भरला ७ लाख ७२ हजार हप्ताप्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २0१६-१७ मध्ये जिल्हय़ामध्ये राबविण्याकरिता नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.मंडळ कार्यालय, मुंबई कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. १८ जानेवारी रोजी प्राप्त माहितीनुसार, पीक विमा योजनेत शेतकर्‍यांनी ७ लाख ७२ हजार ३३८ रुपयांचा हप्ता भरला आहे. यात बुलडाणा उपविभागात ४ लाख २ हजार ९९५ रुपये, खामगाव उपविभागात १ लाख ६१ हजार ८३0 रुपये आणि मेहकर उपविभागात २ लाख ७ हजार ५१२ रुपये भरले आहेत.बुलडाणा उपविभागात चांगला प्रतिसाद जिल्ह्यातील ७ हजार ५४२ शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला असून, यात बुलडाणा विभागातील बुलडाणा, चिखली, मोताळा व मलकापूर या चार तालुक्यातून ४ हजार ३६९ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला, तर खामगाव विभागात १ हजार १४२ तर मेहकर विभागात २ हजार ३१ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.