- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्ग आणि बिघडलेले अर्थकारण या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राला उभारी देण्याचय दृष्टीने यंदा खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उदिष्ठ गाठण्याचे प्रशासनासोबतच बँकांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.गेल्या पाच वर्षाचा पीक कर्ज वाटपाचा आलेख पाहता सातत्याने यामध्ये घट होत असून जिल्ह्यातील तीन लाख ६२ हजार ८२५ शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप आणि तेही वेळेत करणे गरजेचे आहे. त्या तुलनेत आतापर्यंत अवघे आठ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे. प्रत्यक्षात जिल्हतील शेतकऱ्यांना खरीप हंगामाध्ये दोन हजार ४६० कोटी ३४ लाख ८० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत पीक कर्ज वाटपासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची संख्याही आता वाढली आहे. त्यामुळे या प्रत्येक गरजू शेतकºयाला पीक कर्ज देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.वार्षिक पतआराखड्याच्या जवळपास ७० टक्के तरतूद ही पीक कर्जासाठी केलेली आहे. मात्र प्रत्यक्षात खरीप व रब्बीच्या पीक कर्जाचे उदिष्ठ साध्य होत नसल्याचे गेल्या पाच वर्षाची आकडेवारी स्पष्ट करते. यंदा शेतकरी कर्जमाफीमुळे जवळपास तीन लाख ६२ हजार ८२५ शेतकरी पीक कर्जासाठी पात्र ठरले आहे. त्यामुळे या शेतकºयांपर्यंत पीक कर्ज वाटपाचे प्रशासनासमोर आव्हान राहणार आहे.कृषीचे अर्थचक्रही बिघडलेलेजिल्ह्यात गेल्या वर्षी वार्षिक सरासरीच्या ११४ टक्के पाऊस झाला. मात्र खरीप हंगामात हातातोंडाशी घास आल्यानंतर झालेला अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या हातून खरीपाचे पीक गेले. परतीचा पाऊस व आॅक्टोबर दरम्यान आलेल्या दोन चक्री वादळामुळे शेतकºयांच्या शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्याच पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे शेतकºयांचेही अर्थचक्र बिघडलेले आहे.पाच वर्षात लाभार्थी शेतकºयांची संख्या घटतेयगेल्या पाच वर्षाचा आढावा घेतला तर जिल्ह्यात पीक कर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या तुलनेत कमी शेतकºयांना पीक कर्ज मिळाले आहे. जेथे २०१५-१६ मध्ये एक लाख ३२ हजार शेतकºयांपैकी एक लाख १५ हजार ४०३ शेतकºयांना पीक कर्ज मिळाले होते तेथे गेल्या वर्षात पात्र ठरेल्या एक लाख ९७ हजार ८६ शेतकºयांपैकी केवळ ५१ हजार १३१ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करता आले. त्यामुळे पाच वर्षात पीक कर्ज वाटपाचा आकडा ८७ टक्क्यांवरून गेल्या वर्षी २६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यातच यावर्षी पात्र शेतकºयांची संख्या साडेतीन लाखाच्यावर आहे. त्यामुळे या शेतकºयांना पीक कर्ज मिळणे गरजेचे आहे.
पीक कर्ज वाटपाचे प्रशासनासमोर आव्हान; पाच वर्षात टक्केवारी घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 10:50 AM