लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी पिक विमा योजनेत केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने राज्यात सात विविध कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांना लाभ दिल्या जातो. युतीशासनाच्या काळात ५ हजार ७९५ कोटी रूपयांचा विमा ८५ लाखांवर शेतकऱ्यांना मिळाला होता. पंरतु राज्यातील सध्याच्या आघाडी शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांऐवजी ४ हजार २०० कोटी रूपयांचा फायदा विमा कंपनीचा होत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा आ. डॉ. संजय कुटे यानी केला.शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच राज्य शासनाला सुद्धा अधिवेशन काळात जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.शेतकरी पिक विमाच्या प्रश्नावर २ जुलै रोजी स्थानिक पत्रकार भवनामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री संतोषराव देशमुख, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, आशिष व्यवहारे, हर्षल जोशी उपस्थित होते.आ. डॅा. संजय कुटे म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यात जळगांव जामोद, संग्र्रामपूर, शेगांव तालुक्यांना 100 टक्के सोयाबीन पिकांचा विमा लागतो. त्यासाठी केवळ तांत्रीक अडचणी निर्माण करून विमा कंपनी चार महिन्यापासून शेतकऱ्यांना वंचीत ठेवत आहे. त्यामुळे या प्रश्नी आम्ही आवाज उठविणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे पीक विमा कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा- संजय कुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 11:55 AM