ओमप्रकाश देवकर । लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांच्यामार्फत मेहकर उपविभागामध्ये तूर पिकावरील कीड रोगाची पाहणी करण्यात येत असून, तुरीवर पडणार्या अळीपासून तुरीला वाचविण्यासाठी शेतकर्यांना धडे दिले जात आहेत. मेहकर उपविभागामध्ये ७0 टक्के क्षेत्रावर सोयाबीन व तूर हे आंतरपीक खरीप हंगामात घेण्यात आले आहे. सोयाबीन िपकाची काढणी झालेली असून, तूर हे पीक सद्यस्थितीमध्ये कळी व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांच्यामार्फत मेहकर उ पविभागामध्ये तूर पिकावरील कीड रोगाची पाहणी करण्यात येत आहे. सध्या पीक कळी आणि फुलोरा धरण्याच्या अवस्थेत आहे. तूर पिकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणार्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हर्पा), पिसारी पतंग व शेंग माशीचा समावेश होतो. तुरीवर पाने गुंडाळणारी अळी व शेंगेवरील ढेकूण या किडींचासुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो. शेंगा पोखरणार्या अळ्यांचे वेळीच नियंत्रण न केल्यास तूर पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. किडींच्या नियंत्रणासाठी शेतात प्रतिहेक्टरी १0 कामगंध सापळे लावावेत, पक्षी थांबे उभारावेत, पिकाचे निरीक्षण करून फवारणी घ्यावी, शेंगा पोखरणार्या अळय़ा दिसून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी. कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक सुधाकर कंकाळ यांनी प्रत्यक्ष शेतकरी भेटी दरम्यान दिली.
क्रॉपसॅप प्रकल्पाकडून शेतकर्यांना बांधावर धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:35 PM
हिवराआश्रम : क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांच्यामार्फत मेहकर उपविभागामध्ये तूर पिकावरील कीड रोगाची पाहणी करण्यात येत असून, तुरीवर पडणार्या अळीपासून तुरीला वाचविण्यासाठी शेतकर्यांना धडे दिले जात आहेत.
ठळक मुद्देशेतकर्यांनी तूर पिकाकडे अधिक लक्ष देण्याची गरज तूर पिकाची पाहणी