शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

बनावट हक्कसोड लेखाद्वारे कोट्यवधीची फसवणूक; तत्कालीन दुय्यम निबंधकांसह १० जणांवर गुन्हा दाखल

By अनिल गवई | Published: September 07, 2023 8:11 PM

खामगाव येथील प्रथम सत्र न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा नोंदविण्यात आल्याने खामगाव शहरात एकच खळबळ माजली आहे.

खामगाव: वडीलोपार्जीत मालमत्तेचा बनावट व खोटा हक्कसोड तयार करून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन दुय्यम निबंधकांसह १० जणांविरोधात विविध कलमान्वये शहर पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खामगाव येथील प्रथम सत्र न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा नोंदविण्यात आल्याने खामगाव शहरात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत बालकिसन बन्सीलाल चांडक (६४ रा. बी ३०. अशोक वाटिका, जि. सबरकांठा,गुजरात) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, बालकिसन व संतोष बन्सीलाल चांडक यांची वडिलोपार्जीत मालमत्ता असलेले राहते घर पचविण्यासाठी सतीष चांडक आणि किरण सतीष चांडक यांनी स्थावर मालावरील हक्क सोडण्याचा लेख विनामोबदला अशा मथळ्याखाली खोटा व बनावट दस्त अस्तित्वात आणला. बनावट दस्तवेज दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून घेण्यात आला. तसेच तक्रारदारांच्या गैर हजेरीत त्यांच्या नावाचा खोटा व्यक्ती हजार करून तक्रारदारांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली. कोणताही हक्क सोडलेला नसतानाही मालमत्ता हडपण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आल्याची तक्रार खामगाव न्यायालयात कलम १५६(३) अन्वये दाखल केली. 

येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एस.एन.भावसार यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलीसांनी याप्रकरणी सतीश बन्सीलाल चांडक, किरण सतीश चांडक दोन्ही रा. गांधी चौक, विपुल रमणलाल चांडक रा. अमृतबाग, तलाव रोड, खामगांव,, केदारनाथ रामजीवन यादव रा. धोबी गल्ली खामगांव, पवन किशनचंद वर्मा, पंकजकुमार किशनचंद वर्मा, राजेश किशनचंद वर्मा, श्रीमती इंद्राबाई किशनचंद वर्मा सर्व रा. मेनरोड, गजानन राऊत, तत्कालीन दुय्यम निबंधक अरविंद अंबरकर यांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलीसांनी भादंवि कलम ४०५, ४०६, ४०८, ४०९, ४१५, ४१६,४१९, ४२०, ४२१, ४२३,४२४, ४२५, ४६३,४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७०, ४७१, ४७७ अ, १२० ब, ३४, फौ.प्र.सं. स.ह कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक शांतीकुमार पाटील करीत आहेत.

मुद्रांक शुल्कही बुडविला! -फसवणूक करताना भावाच्या पत्नीचे रक्ताचे नाते दाखवून मुंद्राक शुल्कही बुडविण्यात आला. तसेच ऑनलाइन दस्त नोंदणी असतानाही या दस्ताची जाणिवपूर्वक ऑफलाइन नोंदणी करण्यात आल्याचे समोर येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस