धामणगाव धाडः जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे ४ जानेवारी राेजी चित्र स्पष्ट झाले आहे. चिन्हाच्या वाटपानंतर प्रचारास सुरुवात झाली आहे. प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना हाॅटेलात जेवण देण्यात येत असल्याने गर्दी वाढली आहे. तळीरामही या संधीचा लाभ घेत असल्याने दारु विक्रीही वाढली आहे.
सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापु लागले आहे. मतदारांना खुश करण्यासाठी हाॅटेल, शेतात पार्ट्या रंगु लागल्या आहेत. धामणगावसह परिसरातील ग्रामपंचायत निवडणूक सात दिवसांवर येऊन ठेपली आहे. काही मतदार पॅनल प्रमुखांच्या शोधात फिरत आहेत. पॅनल प्रमुखाकडे जेवणासाठी व सायंकाळची सोय सुरू झाली असून, काही तळीरामांना अच्छे दिन आले आहेत. गाव परिसरातील मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, ढाबे हाउसफुल्ल झाले आहेत. गावातील चहाच्या हॉटेल्स, दारूचे दुकाने , मांस विक्रीच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.