भाऊ-बहिणीचे नातेसंबंध जपणारा, या नात्यातील गोडवा टिकवून ठेवणारा, या नात्यातील पवित्र प्रेमाचे प्रतीक समजला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. भाऊ-बहिणीमधील प्रेम व स्नेह वृद्धिंगत करणाऱ्या या सणानिमित्त नगर शहरातील बस स्टँड चौक, धार रोड, लोणी रोड अशा विविध भागांमध्ये राख्यांचे स्टॉल लागले आहेत. या ठिकाणी राखी खरेदी करण्यासाठी दिवसभर लगबग सुरू होती. पारंपरिक राख्यांसोबतच मल्टिकलर लेसेस, कार्टून्स, डायमंड वर्क, फॅन्सी, मोती, स्टोन, गोंड्याच्या राख्या अशा विविध प्रकारच्या राख्या दोन रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत मिळत आहेत. खरेदी करताना नाजूक व फॅन्सी राखीला प्राधान्य देण्यात येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये राख्यांचे भाव स्थिर असल्यामुळे खरेदीमध्ये उत्साह दिसून येत होता. तर, आपल्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनचे गिफ्ट घेण्यासाठी गिफ्ट शॉपीमध्येही गर्दी दिसत होती. रक्षाबंधन भेटकार्ड, ज्वेलरी, पर्स, साडी, टॉप, फोटोफ्रेम, अशा गिफ्टला चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
भरपावसात खरेदीचा उत्साह
दोन दिवसांपासून सतत रिमझिम पाऊस सुरू असताना सुद्धा या रिमझिम पावसामध्ये शहरांमध्ये बाजारपेठेत राखी खरेदीसाठी महिला वर्ग रिमझिम पावसामध्ये खरेदी करता आहे.