लोकमत न्यूज नेटवर्क वरवट बकाल : संग्रामपूर येथील रहिवाशी असलेले व पश्चिम बंगाल सिमेवर कार्यरत असणारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्रभाकर शालीग्राम राजनकर (वय ४०) यांचे ७ फेब्रुवारी रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर ९ फेबु्वारी रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेमक्या कोणत्या कारणाने त्यांचे निधन झाले हे स्पष्ट होवू शकले नाही.प्रभाकर शालीग्राम राजनकर मार्च २००१ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवेत रुजू झाले होते. येत्या मार्च २०२१ ला सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा तेथे ७ फेबु्रवारी रोजी आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर पश्चिम बंगाल येथून मृतदेह ८ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा सीआरपीएफ दलाच्या जवानांनी संग्रामपूर येथे पोहोचवला. मंगळवारी शहरातून भारत माता की जय, वंदे मातरम घोषणेसह अंत्ययात्रा काढुन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तहसीलदार तेजश्री कोरे, ना. तहसीलदार विजय चव्हाण यांनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी संग्रामपूर प,स.चे गटविकास अधिकारी, तलाठी, तालुक्यातील माजी सैनिक, पोलीस कर्मचारी, राजकीय पदाधिकारी, उपस्थित होते. त्यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन लहान मुल १ मुलगा, १ मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे.
सीआरपीएफ जवानाचा आकस्मिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:08 PM