धाेकादायक पुलावरून जड वाहतूक सुरूच
दुसरबीड : नागपूर- औरंगाबाद मार्गावरील दुसरबीड जवळील पुलाची दयनीय अवस्था झाली आहे़ त्यामुळे, या पुलावरून जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे़ मात्र, तरीही जड वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे.
अवैध दारु विकणाऱ्यांवर कारवाई करा
धाड : पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावांमध्ये अवैध दारु विक्री माेठ्या प्रमाणात सुरू आहे़ अनेक गावातील महिलांनी पाेलीस स्टेशनला तक्रार देऊनही त्यावर कुठलीही कारवाई हाेत नाही़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे़
निपाणा येथे २१० जणांनी घेतली लस
माेताळा : तालुक्यातील निपाणा येथील ग्रामपंचायत कार्यालयात काेराेना लसीकरण शिबिराचे आयाेजन ८ जुलै राेजी करण्यात आले हाेते. शिबिरामध्ये २१० जणांनी लस घेतली़ शिबिराला तहसीलदार समाधान साेनाेने यांनी भेट दिली़
काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन
मेहकर : काेराेनाची दुसरी लाट ओसरत असताना नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन हाेत आहे़ मेहकर शहरासह ग्रामीण भागात दुपारी ४ नंतरही दुकाने सुरूच ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे, काेराेना संसर्ग वाढण्याची भीती आहे़
आवक घटल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले
बुलडाणा : बाजारात भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे सध्या भाज्यांचे भाव जवळपास दुप्पटीने वाढल्याचे दिसून येत आहे. मुख्य म्हणजे चढलेल्या किमतीमध्ये सतत वाढणाऱ्या इंधनाच्या दराचाही परिणाम असल्याचे पुढे येते. आवक कमी झाल्याने टोमॅटो, वांगे, मेथीच्या दरात वाढ झाली आहे.
माेटार पंपाची केबल लंपास
माेताळा : तालुक्यातील नळगंगा शिवारातील एका शेतातील मोटार पंपाची ९ हजार रुपये किमतीची केबल वायर अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. ही घटना ५ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पिंपळपाटी येथील शेतकरी सुभाष रघुनाथ घाटे यांचे नुकसान झाले़