तणनाशक फवारणीला फाटा : जमिनीतील ओलाव्यावर पिके जीवंतबुलडाणा : जिल्ह्यात १५ दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून, सध्या पिकेजमिनीतील ओलाव्यावर तग धरून आहेत. शेतातील पेरणी जरी ट्रॅक्टरच्यासहाय्याने केली तरी कोळपणी मात्र पारंपरिक पद्धतीनेच करण्यात येत आहे.यावर्षी शेतकऱ्यांकडे तणनाशकाची फवारणी करण्यासाठी सुद्धा पैसे नसल्यानेसध्या पिकांमधील तण नष्ट करण्यासाठी शेतकरी बैलांच्या सहाय्यानेचकोळपणीची पारंपारिकम पद्धतीने कामे करत आहेत.जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरवरून राजाने चांगली हजेरी लावलीहोती. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि काही शेतकरीपावसाच्या प्रतीक्षेत नभाकडे नजर लावून बसले. ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यापावसानंतर पेरणी केली त्यांचे पीक पहिल्या कोळपणी साठी सज्ज झाली आहेत.आपल्या पिकात तन जास्त प्रमाणात विस्तारू नये यासाठी शेतकरी डवऱ्याच्यासाहाय्याने पिकामध्ये कोळपणी करत आहेत. पावसाने उघाडीप दिल्याने काहीशेतकऱ्यांची पेरणी ठप्प झालेली आहे. मात्र मृग नक्षत्रात झालेल्या पावसावरअनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यामुळे सध्या शेतात सोयाबीन, मूग, उडीद,तूर, कपाशी आदी पिके चांगली बहरलेली आहेत. जमिनीत सध्यातरी ओलावा कायमअसल्याने पिकांमध्ये तणाचे प्रमाणही वाढले आहे. पिकातील वाढलेले तणशेतकऱ्यांकरिता मनस्तापाचे कारण असताना निंदनाच्या खर्चाचा मोठा फटकाशेतकऱ्यांना बसत आहे. मजुरीचे दरच कडाडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटकाबसत आहे. सुरुवातीला पावसाने हजेरी लावली व लगेच पावसाने दडी मारली.त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटास सुद्धा सामोरे जावेलागले. पावसाची उघडीप असल्याने सध्या पिकांमध्ये करण्यात येत असलेलीकोळपणी पिकांसह पोषक ठरत आहे. त्यामुळे वाढलेले तणही नष्ट करण्यासाठीफायद्याची ठरत आहे.शेतकऱ्यांचा यावर्षी कोळपणीवर भरशेतातील तण नष्ट करण्यासाठी विविध तणनाशक औषधांची फवावरणी करण्यात येते.मात्र, यावर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडले. त्यामुळे तणनाशकाचा खर्चशेतकऱ्यांना न परवडणार आहे. शेतात पिकांपेक्षा तण अधिक झाल्याने व महागडेतणनाशक यावर्षी शेतकरी वापरू शकत नाहीत. त्यामुळे यावर्षी बैलांच्यासहाय्याने कोळपणी करण्यावर सर्वाधिक शेतकऱ्यांचा भर आहे.
पिकातील कोळपणीही जपते परंपारिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2017 1:44 PM