करोना विषाणू (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, लागू करण्यात आलेला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात कोविड-१९ चे आनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ३० एप्रिल २०२१ पर्यंत विशेष निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ५ एप्रिल ते ३० एप्रिल, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत हा सुधारित आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.०० ते रात्री ८.०० पर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू राहील या कालावधीत ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. अनावश्यकरीत्या कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय शहरात व गावात फिरू नये, त्यांनी त्यांचे घरात वास्तव्य करावे. याव्यतिरिक्त असलेल्या वेळेत म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० ते सकाळी ७.०० पर्यंत व शुक्रवारी रात्री ८.०० ते सोमवार सकाळी ७.०० पर्यंत संचारबंदी लागू राहील. या कालावधीत कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय, विहित परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी, बाहेर, शहरात व गावात फिरू नये, आठवडा अखेर शुक्रवार रात्री ८.०० ते सोमबार सकाळी ७.०० पर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहील. संचारबंदी कालावधीमध्ये वैद्यकीय सेवेसह अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत जमावबंदी, रात्रीची संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:34 AM