डोणगाव : काेराेना संसर्ग वाढत असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली असून, जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, डाेणगाव येथे ३ मे राेजी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान जीवनाश्यकसह इतर दुकाने सुरू हाेती. त्यामुळे खरेदीसाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी उसळली हाेती. दरराेजच गर्दी हाेत असल्याने काेराेना संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे.
महामार्गावर असलेले डाेणगाव ही परिसरातील माेठी बाजारपेठ आहे. गावात केवळ जीवनाश्यक वस्तूंची दुकानेच सुरू ठेवण्याची आदेश आहेत. दरराेज खरेदीसाठी ग्रामस्थांची गर्दी हाेत आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेत सर्वच व्यापारी आपली दुकाने उघडत असल्याने डोणगाव येथे सकाळी गर्दी हाेत आहे. त्यामुळे संचारबंदीबरोबरच लॉकडाऊनचा फज्जा उडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे डोणगाव येथे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. डोणगाव येथे बाजारपेठ असल्याने येथील सोने, चांदीची दुकाने, कापड दुकाने त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त सर्व दुकाने सकाळी उघडली जात आहेत. सकाळी बसस्थानक परिसरात व आठवडी बाजारात तसेच गावात दुकाने उघडली जात असल्याने गर्दी दिसून येत आहे. ११ वाजेला सर्व दुकाने बंद झाल्यानंतर रस्त्यावर मात्र शुकशुकाट असताे. सकाळी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने उपाययाेजना करण्याची गरज आहे.