लोकमत न्यूज नेटवर्कचांडोळ: सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार हे नागरिक व शेतकर्यांसाठी फसवे, खोटे आश्वासन देणारे सरकार आहे, असे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी इरला येथे सभेत केले. चांडोळ गणांतर्गत येणार्या इरला व इरलावाडी येथे काँग्रेस व युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन ५ नोव्हेंबरला करण्यात आले होते. शाखाचे उद्घाटन धाड रिजवान सौदागर यांच्या हस्ते करण्यात आले. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून धाड जि.प. सदस्य रिजवान सौदागर, बुलडाणा, पं.स. सभापती रसुल खान, पं.स. सदस्य अमोल तायडे, पंडित चाटे, चाँद मुजावर, चिखली युवक काँग्रेसचे अध्यक्ष रमेश सुरडकर, सरचिटणीस गजानन घायाल, जाफ्राबादचे सुरेश गवळी, उमेश दांडगे, अनिल फेफाळे, नंदू शिंदे, सरपंच रामदास शेळके, सुनील चांदा, गजानन मरमट, मदन जंजाळ, हरुण पठाण, राजू धनावत, शिवाजी देशमुख, बबलू गुजर, शे. नदीम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभू वाघ होते. जि.प. सदस्य रिजवान सौदागर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकार सध्या मस्त; मात्र जनता त्रस्त अशी स्थिती आहे. आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात अनेक आंदोलने झाली तरी या सरकारवर काही फरक पडत नाही. जिल्ह्याचे कृषी मंत्री असूनसुद्धा काही फायदा नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविक शिवाजी शाळेचे शिक्षक संजय वानखेडे व विजय वाघ यांनी केले. आभार मोहन खंडागळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रा.पं. सदस्य दीपक मुर्हाडे, राजू मुर्हाडे, गणेश पुढारी, साहेबराव जंजाळ, भास्कर वाघ, तुकाराम खंडागळे, अण्णासाहेब खंडागळे, दिलीप सत्तावन, पन्नालाल मुर्हाडे, विजय मुर्हाडे व अन्य उपस्थित होते. दरम्यान, बोलताना आ. बोंद्रे यांनी पूर्वीचा १८ मतांचा येथील रेकॉर्ड तुटणार असल्याचे सांगितले.
प्रत्येक गावात शाखा स्थापन करणार!चांडोळ परिसरातील प्रत्येक गावागावात जाऊन काँग्रेस व युवक काँग्रेसची शाखा स्थापन करण्यात येईल. ग्राम इरला येथूनच अभियानास सुरुवात झाल्याचे गजानन मरमट यांनी यावेळी कार्यक्रमात स्पष्ट केले.