विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्राचिन काळापासून प्रगल्भ सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या वऱ्हाडात सुरूवातीपासूनच सकस व दर्जेदार साहित्य निर्मिती होत आली आहे. हीच परंपरा साहित्यिकांनी कायम ठेवली असून, यावर्षी वऱ्हाडातील चार साहित्यिकांचे साहित्य बालभारती व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात सकस व गुणवत्तापूर्ण साहित्य लिहीणाऱ्या अनेक साहित्यिकांचा समावेश आहे. यापैकीच मराठी सारस्वतातील सर्वात मोठा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले ह्यबारोमासकारह्ण प्रा. सदानंद देशमुख यांच्या तहान कादंबरीचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्राच्या लेखणी व वाणी या दोन क्षेत्रातील वलयांकीत कारकिर्दीचे धनी, मराठी कवी, नामवंत निवेदक अजीम नवाज राही यांच्या ह्यव्यवहाराचा काळा घोडाह्ण या कवितासंग्रहाचा एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. बालकवि सुभाष किन्होळकर यांचा ह्यनात्याबाहेरच नातंह्ण हा पाठ बालभारतीच्या सातवीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांचे मशाल, रानमेवा हे काव्यसंग्रह, ट्रिंग ट्रिंग, हसत- खेळत हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. तसेच कारंजा येथील ग्रामीन विनोदी कथालेखक अशोक मानकर यांचा ह्यगचक अंधारीह्ण हा धडाही बालभारतीच्या सातवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. यापूर्वी मानकर यांचे हेंबाळपंथी, हुनेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क हे विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या यावर्षीपासून सुरू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमात अजिम नवाज राही यांचा ह्यव्यवहाराचा काळा घोडाह्ण चा समावेशबुलडाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद घटना आहे. २००४ साली लोकनाथ यशवंत यांच्या मुक्तछंद प्रकाशनने ह्यव्यवहाराचा काळा घोडाह्ण राहींचा हा पहिला कवितासंग्रह प्रसिध्द केला. या कवितासंग्रहाने रूढ मराठी कवितेची चौकट बदलली. शिवाय महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या ४२ पुरस्कारांचा हा कवितासंग्रह मानकरी ठरला. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने या कवितासंग्रहातल्या ह्यदुष्काळह्ण नावाच्या कवितेचा इयत्ता १० वी च्या अभ्यासक्रमात समावेश केला. यासोबतच यावर्षी राही यांच्या कल्लोळातील एकांत या कवितासंग्रहातील ह्यभंगारह्ण या कवितेचा बी. ए. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बी.ए.भाग चे विद्यार्थी येत्या पाच वर्षासाठी मराठी विषयासाठी तहान कादंबरी अभ्यासणार आहेत. गेल्या वर्षीच नागपूर विद्यापिठाने आपल्या बी.ए.च्या अभ्यासक्रमात या कादंबरीचा समावेश केला आहे. आता अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्यामुळे संपूर्ण विदर्भातील विद्यार्थी ही कादंबरी अभ्यासणार आहेत. बारोमास कादंबरीचा इंग्रजी आणि हिंदीमधील अनुवाद विविध अभ्यासक्रमात आहे. तर त्यांची ह्यसोन होवून उगावंह्ण ही कविता वर्ग ११ च्या अभ्यासक्रमात महाराष्ट्र राज्य अभ्यास मंडळाने समाविष्ट केली आहे. पाण्याप्रमाणेच मानवी मनाची तृष्णा विविध पातळ्यावर अधोरेखित करणाऱ्या तहान कादंबरीचे साहित्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आहे.
वऱ्हाडातील साहित्य झळकले अभ्यासक्रमात
By admin | Published: June 16, 2017 8:30 PM