लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : हज यात्रेला सेवाधारी म्हणून नेतो, अशी बतावणी करून फसवणूक केल्या प्रकरणी दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने एका आरोपीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. जी. म्हस्के यांनी एक वर्षाची सक्त मजुरी आणि दीड लाखांचा दंड ठोठावला.ख्वाजाखा सरदारखा हा व्यक्ती राज्य परिवहन मंडळाच्या शेगाव आगारात लिपिक पदावर कार्यरत आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपी होते. खामगाव येथील रशिदखा दाऊदखा व इतर सात जणांना २00७ मध्ये एसटी लिपिक ख्वाजाखा सरदारखा याने हज यात्रेसाठी सेवाधारी म्हणून नेतो, असे सांगून त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये घेतले; मात्र कोणालाही यात्रेला पाठवले नाही. तसेच पैसेसुद्धा परत केले नाही. याप्रकरणी रशिदखा यांनी व इतर सात जणांनी खामगाव पोलिसांत ख्वाजा खा सरदार खासह अन्य व्यक्तींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने या प्रकरणातील साक्षीदार व पुरावे तपासले. त्यात ख्वाजा खा सरदार खा याच्या विरोधात दोष सिद्ध झाल्याने न्याय दंडाधिकारी ए. जी. म्हस्के यांनी त्यास एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अधिवक्ता संध्या व्ही.इंगळे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक म्हणून खासगी वकील मो.आबीद मो.हनीफ शेख यांनी काम पाहिले.
फसवणूक करणार्या आरोपीस सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:10 IST
हज यात्रेला सेवाधारी म्हणून नेतो, अशी बतावणी करून फसवणूक केल्या प्रकरणी दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने एका आरोपीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. जी. म्हस्के यांनी एक वर्षाची सक्त मजुरी आणि दीड लाखांचा दंड ठोठावला.
फसवणूक करणार्या आरोपीस सश्रम कारावास
ठळक मुद्देदीड लाखाचा दंडही ठोठावला!हज यात्रेला सेवाधारी म्हणून नेतो, अशी बतावणी करून फसवणूक