मेहकर तालुक्यात काेराेनाचा उद्रेक
मेहकर : शहरासह तालुक्यात काेराेनाचा उद्रेक झाला आहे़ शुक्रवारी शहर व तालुक्यात १५४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागरिकांमध्ये काेराेनाविषयी गांभीर्य नसल्याचे चित्र आहे़
माेताळ्यात संचारबंदीची अंमलबजावणी
माेताळा : शहरात १५ एप्रिल रोजी तालुका प्रशासनाच्या वतीने दवाखाने, औषधीची दुकाने तथा शेती उपयोगी वस्तूंची दुकाने वगळता पूर्ण दुकाने बंद करून कडक लॉकडाऊन पाळण्यात आले. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.
ऑनलाइन वीज बिल भरण्याची सोय
बुलडाणा : वीज ग्राहकांनी आरोग्यविषयक काळजी घेत रांगेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन इतर व्यक्तींच्या संपर्कात येण्याऐवजी एका क्लिकवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन सोयीद्वारे घरबसल्या वीज बिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
देउळगावराजात ९० पाॅझिटिव्ह
देउळगाव राजा : शहरासह तालुक्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़ शुक्रवारी तालुका व शहरातील ९० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत़ ब्रेक द चैन अंतर्गंत संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी नागरिक रस्त्यावरच असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात आहे़
बिबट्याची दहशत कायम
ढोरपगाव: खामगाव तालुक्यातील ढोरपगाव शिवारात गत काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे
पारखेड शिवारातील खदानी बंद करा
खामगाव: तालुक्यातील पारखेड शिवारातील खदानी तात्काळ बंद करा, अशी मागणी पारखेड येथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले आहे.
रेमडिसिविर इंजेक्शनचा तुटवडा
शेगाव : कोरोनावर निघालेल्या रेमडीसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रूग्ण रेमडिसिविर इंजेक्शन जास्त किमतीत खरेदी करीत आहेत. त्यामुळे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.