तालुक्यातील भरोसा व परिसरात गत १० वर्षांपासून रोहींचा मुक्त संचार वाढला आहे. आजरोजी सुमारे ४० ते ५० प्राण्यांचा एक मोठा कळप तयार झाला असून, या परिसरातील सिंचन प्रकल्प तसेच खडकपूर्णाचा कालवा असल्याने पाण्याची सोय असल्याने कालवा व धरण परिसरात मोठ्या प्रमाणात या प्राण्यांनी हैदोस घातला आहे. दरम्यान, सिंचनाची सोय असल्याने या भागातील शेतकरी उन्हाळी पिकेदेखील आहेत. मात्र, या उभ्या पिकात घुसून या प्राण्यांकडून पिके फस्त केली जात आहेत. तथापि, आकाराने मोठे तसेच घोड्याप्रमाणे भरधाव वेगात पिकातून धावत सुटत असल्याने त्यांच्या धुमाकुळाने पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. या प्राण्यांच्या हैदाेसातून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात रात्र जागून काढावी लागत आहे. शेतकरी पाईपच्या साहाय्याने तयार केलेल्या व मोठा आवाज करणाऱ्या बंदुकीचा वापर करून या प्राण्यांना हुसकावून लावत आहेत. या प्राण्यांमुळे गहू, शाळू, हायब्रिड, हरभरा, कांदा, मका या पिकांचे मोठे नुकसान होत केले आहे.
वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:05 AM