लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या संतधार पावसानंतर १७ आॅगस्ट रोजी झालेल्या दमदार पावसादरम्यान सहा तालुक्यातील आठ हजार ५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १५९ गावातील शेतजमीन बाधीत झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.जुलै महिन्यात १५ ते १६ आॅगस्ट दरम्यान शेगाव व खामगाव तालुक्यातील आठ मंडळात झालेल्या अतिवृष्टीत १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते तर २०० हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली होती. त्यानंतरचे यंदाच्या पावसाळ््यातील दुसरे मोठे नुकसान आहे. १७ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसादरम्यान बुलडाणा, चिखली, संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा या सहा तालुक्यात प्रामुख्याने आठ हजार ५१ हेक्टरवरील पिकांचे हे नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यात चार हजार ११८ हेक्टर, चिखली तालुक्यात १,९४४ हेक्टर, संग्रामपूर तालुक्यात ८५, मेहकर तालुक्यात १५०, लोणार तालुक्यात ३२१, देऊळगाव राजा तालुक्यात ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.महसूल विभागने नुकसानाचे पंचनामे सुरू केले आहे. धाड व म्हसला मंडळामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून एकट्या बुलडाणा तालुक्यातील ८६० हेक्टरवरील जमीन खरडली असून नदी काठावरील पिकांना फटका बसला.
९१६ हेक्टरवरील जमीन खरडलीएकट्या बुलडाणा तालुक्यात ९१६ हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही शेत जमीन पुन्हा पुर्ववत कसण्या योग्य करण्यासाठी बराच कालावधी जावा लागणार असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात शेगाव व खामगाव तालुक्यातील आठ मंडळामधील २०० हेक्टर जमीनही अशीच खरडून गेली होती. त्यामुळे आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात १,०१६ हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेल्याचे वास्तव आहे.