शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अतिवृष्टीमुळे दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:58 AM

१० हजार १५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे कृषि विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जिल्ह्यात १९ व २० सप्टेंबर रोजी झालेला पाऊस व वादळीवाऱ्यामुळे १० हजार १५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे कृषि विभागाच्या प्राथमिक नुकसान अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच हजारो हेक्टर जमिन खरडून गेली आहे.जिल्ह्यात गत पंधरा दिवसांत चार ते पाच वेळा वादळी वाºयासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मूग व उडिदाच्या पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे मूग व उडिदाच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहे. तसेच शेंगा काळ्या पडल्या आहेत.परिणामी शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान सहन करावे लागणार आहे. तसेच वादळी वाºयासाह पाऊस सतत सुरू असल्यामुळे कपाशी व सोयाबिनचेही नुकसान होत आहे. कपाशीची बोंडे गळून पडली आहेत. काही भागात कपाशीची पानेही गळून पडली आहे. त्यामुळे या पिकांचेही नुकसान होत आहे. घाटाखालील खामगाव तालुक्यात ३५७ हेक्टरवरीलसोयाबिन व कापूस पिकाचे १९ व २० सप्टेंबर रोजी आलेल्या पावसामुळे नुकसान झाले तर शेगाव तालुक्यात ८७१ हेक्टरवरील कापूस, मका, ज्वारी व सोयाबिनचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यात ४०० हेक्टरवरील मका, उस, ज्वारी व कापसाचे नुकसान झाले. मोताळा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात २५७३ हेक्टरवरील कपाशी, मका, ज्वारी व केळी पिकाचे नुकसान झाले आहे. मलकापूर व जळगाव जामोद तालुक्यात कृषि विभागाच्या अहवालानुसार नुकसान झाले नाही. तसेच जिल्ह्यात २२१ गावांमधील शेती पावसामुळे बाधित झाली आहे.यामध्ये सर्वाधिक नुकसान सिंदखेड राजा तालुक्यात झाले असून, ६५ गावे बाधित झाली असून, ३४१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील २९ गावे बाधित झाली असून, २५७३ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावagricultureशेती