पिके वाचवण्यासाठी अनेक शेतकरी रात्रीला शेतात जागल करताना दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी शाळू ज्वारी, कांदा , मका, गहू ,हरभरा इतर रब्बीचे पिके पेरली होती. सध्या शाळु ,मका,कांदा इतर पिके उभी असून रोही हे प्राणी शाळू ज्वारी चे उभ्या पिकाचे काढणीला आलेले कणीस फस्त करीत आहेत. रात्रीला उभ्या पिकातून मुक्तसंचार करीत असून पिके फस्त करीत आहेत. रोही हे वन्य प्राणी कळपा कळपाने रहात असून उभ्या पिकात धावत असल्याने ज्वारीचे पीक जमीनदाेस्त हाेत आहे. अगोदरच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने खर्च वसूल झाला नाही अशा अस्मानी सुलतानी संकटाने शेतकरी फार वैतागला आहे. दिवसभर शेतात राबावे लागते व रात्रीला रोह्या वन्य प्राण्यांकरता जागल करावी लागत आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.
किनगाव जट्टू परिसरात वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 5:01 AM