--जिल्ह्यात ८.५ मिमी पाऊस--
रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा, मेहकर, सिंदखेड राजा, मलकापूर, चिखली, देऊळगाव राजा, संग्रामपूर या तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत मोठे नुकसान केले आहे. महसूल प्रशासन सध्या त्याची माहिती घेत आहे. बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक असा २८ मिमी पाऊस पडला. मेहकरमध्ये १८, मलकापूरमध्ये १६ सिंदखेड राजामध्ये १२, चिखलीमध्ये दहा, देऊळगाव राजामध्ये ९, शेगावमध्ये ३, मोताळ्यात ९, नांदुऱ्यात ५, जळगाव जामोदमध्ये २ मि.मी. पाऊस पडला. खामगाव आणि लोणार तालुक्यातही या पावसाने हजेरी लावली.
--नुकसानाचे सर्वेक्षण सुरू--
महसूल विभागाच्या साहाय्याने जिल्ह्यात ग्रामीण भागात या पावसामुळे झालेल्या नुकसानाची आपत्ती व्यवस्थापन विभाग सध्या माहिती घेत आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानामध्ये त्यामुळे प्रसंगी वाढ होण्याची शक्यात सूत्रांनी व्यक्त केली आहे.