खामगाव : वादळी वा-यामुळे खामगाव तालुक्यातील अनेक गावात नुकसान झाले. शुक्रवारी मध्यरात्री दमदार पावसाचे आगमन झाले. दरम्यान सुसाट वा-यामुळे खामगाव शहरासह अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे. खामगाव शहरातील कॉटन मार्केट फिडर बंद पडले होते. त्यामुळे खामगाव शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. खामगावात रात्री बारा वाजेनंतर मुसळधार पावसाची सुरुवात झाली. रात्री एक वाजेदरम्यान अकोला रोडवर सुसाट वा-याने टीनशेड उडून विद्युत तारेवर अडकला. त्यामुळे शॉर्ट सर्किट झाला. याशिवाय जलंब नाका परिसरात निंबाच्या झाडाची फांदी कोसळली. त्यामुळे नांदुरा रोडवरील वाहतूक विस्कळीत झाले. त्यामुळे या भागातून जाणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. खामगाव शहरातील विद्युत पुरवठा सकाळपर्यंत विस्कळीत झाला होता.
वादळी वा-यामुळे खामगाव तालुक्यात नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 13:17 IST