पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा काही ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग जमा होत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे बळिराजा सतर्क होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा, मका, हरभरा, कांदा, ज्वारी, बाजरी, गहू यासह अनेक फळभाज्यांना याचा तडाखा बसला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना विषाणूने संकटासोबत दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पुन्हा अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खाडेन्भराड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजू चित्ते, राजू सिरसाट, सुरेश ददाले, आदी मंडळी उपस्थित होते.
नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : गंगाधर जाधव
यावर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत जीवन जगत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता. मात्र, हाती तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नुकसानभरपाईचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव यांनी केली आहे.