या पावसाने देऊळगावमही परिसरात गहू, हरभरा, मका पिकाचे नुकसान झाले. डिग्रस बू. येथील द्राक्ष बाग, संत्रा, पेरूच्या बागे मोठे संकट आले आहे. अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक काढणीचा हंगाम सुरू असताना झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची पीके जमीनदोस्त झाली आहेत. अर्धा ते एका तासात देऊळगावमही परिसरातील ३० ते ३५ गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
अंढेरा येथेही वादळी पाऊस
अंढेरा: देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा परिसरातही वादळी पाऊस झाला आहे. अद्यापही या भागात ढगाळ वातावरण असून सायंकाळ दरम्यान काही भागात तुरळक स्वरुपात अवकाळी पाऊस पडला. अंढेरा येथे अवकाळी पावसाने २०१८ मध्ये मोठे नुकसान केले होेते. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत आहे.