शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

डोमरूळ येथे डेंग्यूसदृश ताप असलेला रुग्ण आढळला!

By admin | Published: September 20, 2016 12:27 AM

सातगाव, धामणगावात तापाची साथ.

डोमरूळ (जि. बुलडाणा), दि. १९: डोमरूळ येथील समाधान जाधव या मुलाची प्रकृती अत्यवस्थ झाली असून, त्याला डेंग्यूसदृश ताप झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथील माजी उपसरपंच सागर जाधव यांचा मुलगा समाधान याला १४ सप्टेंबर रोजी अस्वस्थ वाटत असल्यामुळे धाड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून डॉक्टरांनी औरंगाबाद येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याला औरंगाबाद येथील रुग्णालयात भरती केले. त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत, तसेच साक्राबाई महाले, अनिता काकफळे या थंडी-तापाने ग्रस्त आहेत. तालुक्यातील जामठी, डोमरूळ, टाकळी, सातगाव म्ह., धामणगाव, कुलमखेड, पांगरी उबरहंडे यांसारख्या अनेक गावात धूळफवारणी नाही. त्यामुळे डासांचा उद्रेक वाढला आहे. गटार सफाई, नाले सफाई, तणनाशक फवारणी, पाणी तपासणी गावातील मोकळ्या जागेवरील घाण, सांडपाणी विल्हेवाट सदोष असल्यामुळे अनेक ठिकाणी जनतेला नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. डोमरूळ येथील जुने गाव आणि नवीन वस्ती यांच्यादरम्यान वाहत असलेल्या नाल्याची साफसफाई नियमित होत नाही. जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरत आहे.