लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा आहे. त्यात नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ होणार असून, टंचाईग्रस्त १४0 गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ९७ हातपंपांचा आधार घ्यावा लागणार आहे.जिल्ह्यात ७१२.७ मि.मी. सरासरी पर्जन्यमान अस ताना यावर्षी आजपर्यंत ४९५.६ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ६९.९३ टक्के पाऊस झाला आहे. सदर पाऊस अल्प असून, जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा आला आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत विंधन विहिरी व कूपनलिका घेण्यात येतात; मात्र मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे यापूर्वी घेण्यात आलेल्या विंधन विहिरी व हातपंपाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आज रोजी अनेक ठिकाणच्या विंधन विहिरी व हातपंप नादुरुस्त आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने काही वर्षांत ट प्प्याटप्प्याने गाव, वाड्या, वस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसवले आहेत. हे हातपंप सुरुवातीच्या काळात सुयोग्य पद्धतीने चालले; पण देखभाल दुरुस्तीअभावी अनेक पंप, अनेक वर्षां पासून बंद पडले आहेत. त्यांचा वापर थांबल्याने पंप गंजले, तुटले आहेत. तर येणार्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे गावे व हवामानाचा अंदाजानुसार यावर्षी पाणीटंचाईग्रस्त गावात विंधन विहिरी व कूपनलिका घेण्यासाठी प्रस्ताव पाठवून उ पाययोजना करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील संभाव्य १४0 गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी १४९ कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या पैकी १0८ कामांना मंजुरी देऊन १0४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यात ९२ ठिकाणी हातपंप तर ५ ठिकाणी वीज पंप बसविण्यात आले आहेत. तर ७ ठिकाणी पाणी खोल असल्याचे दिसून आले.
नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:45 AM
बुलडाणा: यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा आहे. त्यात नादुरुस्त हातपंपांमुळे पाणीटंचाईत वाढ होणार असून, टंचाईग्रस्त १४0 गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ९७ हातपंपांचा आधार घ्यावा लागणार आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्प जलसाठा १४0 गावे पाणीटंचाईग्रस्त गावांना ९७ हातपंपांचा आधार