शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

खचलेल्या, बुजलेल्या विहिर दुरुस्तीची कामे अडकली मंजुरीत!

By admin | Published: December 30, 2014 12:00 AM

अमरावती विभागात तीन हजारांवर विहिरींच्या कामांसाठी प्रशासकीय मंजूरी रखडली.

संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अतवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीची कामे तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीअभावी रखडली आहेत. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ३ हजार ३४ विहिरींच्या दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत.गतवर्षी (२0१३) पावसाळ्यात राज्यातील विविध भागात अतवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांच्या विहिरी गाळाने बुजल्या, तर काही ठिकाणी विहिरी खचल्या आहेत. शेतातील विहिरी बुजल्याने आणि खचल्यामुळे शेतकर्‍यांना पाण्याविना पीक घेणे शक्य नव्हते. या पृष्ठभूमीवर राज्यात अतवृष्टीमुळे खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यास गत २३ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. अतवृष्टीमुळे बुजलेल्या विहिरींचे कृषी व महसूल खात्याच्या अधिकार्‍यांमार्फत पंचनामे करून, बुजलेल्या विहिरींची नोंद सात-बारावरून कमी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देशही या शासन निर्णयान्वये देण्यात आले होते.खचलेल्या विहीर दुरुस्तीच्या कामासाठी अंदाजपत्रकास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे; मात्र तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त नसल्याने, विहिरींच्या दुरुस्तीची कामे सुरु होवू शकली नाही. संबंधित यंत्रणेच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजूरीअभावी अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात बुजलेल्या व खचलेल्या ३ हजार ३४ विहिरींच्या दुरुस्तीची कामे रखडली आहेत. त्यामध्ये २ हजार ९२९ खचलेल्या आणि १0५ बुजलेल्या विहिरींचा समावेश आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अतवृष्टीमुळे खचलेल्या आणि बुजलेल्या शेतकर्‍यांच्या विहिर दुरुस्तीची कामे रोहयोअंतर्गत करावयाची आहेत. त्याअनुषंगाने जिल्हानिहाय किती कामांसाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली, यासंदर्भात विभागातील पाचही जिल्ह्यांच्या उपजिल्हाधिकारी (रोहयो) कडून माहिती मागविण्यात आली असल्याचे अमरावती विभाग उपायुक्त (रोहयो) एस.टी.टाकसाळे सांगीतले. अमरावती विभागात बुजलेल्या-खचलेल्या विहिरी!जिल्हा              खचलेल्या           बुजलेल्या               एकूण अमरावती             ५८३                    ...                       ५८३ अकोला                 ९६                       ..                      0९६यवतमाळ              २३                      ..                       0२३बुलडाणा               ७६४                   १0५                     ८६९ वाशिम                १४६३                  ..                        १४६३....................................एकूण                  २९२९                १0५                       ३0३४....................................